Saturday, September 6, 2025
Homeजळगावघरातून न सांगता निघून गेलेला पंधरा वर्षीय सोहम अखेर पोलीसांच्या मदतीने सापडला;

घरातून न सांगता निघून गेलेला पंधरा वर्षीय सोहम अखेर पोलीसांच्या मदतीने सापडला;

घरातून न सांगता निघून गेलेला पंधरा वर्षीय सोहम अखेर पोलीसांच्या मदतीने सापडला;

वरणगाव          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               ता भुसावळ दि २९ :
तालुक्यातील सुसरी येथील पंधरा वर्षीय सोहम चौधरी हा मुलगा घरातील कोणालाही न सांगता अचानक निघून गेला होता.त्यानंतर त्याचे वडील कैलास चौधरी यांनी वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली होती.त्यांनी नातेवाईक व मित्र परिवारामध्ये शोध घेऊनही सोहमचा शोध लागला नव्हता.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधपथक तयार करण्यात आले.बोदवड रस्त्यावरील श्री नागेश्वर महादेव मंदिर परिसरात सोहम आपल्या एका मित्राला दिसून आला होता. त्याने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली,मात्र पोलिस तेथे पोहोचेपर्यंत सोहम तिथून निघून गेला होता.

त्यानंतर पोलिसांनी वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन, तिरंगा सर्कल,बसस्थानक चौक आदी ठिकाणी शोध मोहीम राबवली.या दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सोहम भुसावळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला आहे.पोलिसांनी त्वरीत भुसावळ रेल्वे स्थानक गाठले असता,सोहम प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर सापडला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये आणले आणि नंतर त्याचे पालक कैलास व सौ.चौधरी यांच्या स्वाधीन करण्यात आले.सोहमचे आई-वडील कैलास आणि सौ.चौधरी यांनी मुलगा सुखरूप सापडल्याबद्दल वरणगाव पोलिस स्टेशनचे व संपूर्ण पोलिस प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले.त्यांनी सांगितले की, “आमच्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जे प्रयत्न केले, ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही.आम्ही पोलिस प्रशासनाचे ऋणी आहोत.”
या कामगिरीमुळे वरणगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून,नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले आहे.

विशेष शोध पथक –
पीएस आय मंगेश बेंडकोळी ,वाहतुक पोलिस फिरोज पठाण,विजय बाऊस्कर,महिला पोलीस आशा बावस्कर, ईश्वर तायडे,सचिन गुमळकर,नागेंद्र तायडे,श्रावण जवरे यांचा समावेश आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या