Friday, September 5, 2025
Homeजळगावरेल्वे प्रशासनाचे दावे खोटे ; भुसावळ स्थानकावर चोरवाटांचा सर्रास वापर अद्यापही सुरूच

रेल्वे प्रशासनाचे दावे खोटे ; भुसावळ स्थानकावर चोरवाटांचा सर्रास वापर अद्यापही सुरूच

रेल्वे प्रशासनाचे दावे खोटे ; भुसावळ स्थानकावर चोरवाटांचा सर्रास वापर अद्यापही सुरूच

भुसावळ           खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि ३० ऑगस्ट :
भुसावळ रेल्वे स्थानकास लागून असलेल्या चोरवाटांचा प्रश्न अद्यापही तसाच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रेल्वे प्रशासन वेळोवेळी या वाटा बंद केल्याचे दावे करत असले तरी, प्रत्यक्षात या मार्गांचा सर्रास वापर सुरूच आहे.
लोखंडी पुलाजवळ गाड्या थांबवल्यानंतर प्रवासी रुळांवर उतरून थेट साने गुरुजी चौकाजवळील स्मारकावरून उतरत असल्याचे चित्र दररोज पाहावयास दिसते.

रेल्वे स्थानक परिसरात चोरवाटांचा वापर केवळ प्रवाशांपुरताच मर्यादित नसून,अनेक अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेतेही याच मार्गाने स्थानकात प्रवेश करतात.मुख्य प्रवेशद्वारा जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून बचाव करण्यासाठी हे चोरटे मार्ग विक्रेत्यांचे मुख्य साधन बनले आहेत.
यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सुरक्षा सूचना राहतात केवळ कागदावर –

रेल्वे स्थानकाचे दरवर्षी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरक्षा ऑडिट केले जाते.या अहवालात प्रत्येकवेळी चोरवाटा बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात,मात्र त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
सतारे भागातील संरक्षण भिंतीचे कामही रखडल्याने, अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वाटा तयार करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा ऑडिटची अंमलबजावणी नाही –
दरवर्षी रेल्वे स्थानकाचे सुरक्षा ऑडिट पोलिस प्रशासनाच्या मदतीने केले जाते.
या अहवालांमध्ये नेहमीच चोरवाटा बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात.तथापि,रेल्वे प्रशासन या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.विशेषतः सतारे भागातील संरक्षण भिंतीचे कामही रखडलेले आहे, ज्यामुळे चोरवाटा खुलेआम वापरल्या जात आहेत.

प्रशासन गंभीर होणार कधी ?
स्थानिक प्रवासी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जर हे प्रकार असेच सुरू राहिले, तर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेल्वे प्रशासनाने केवळ बैठकीत उत्तर देऊन हात झटकण्या ऐवजी प्रत्यक्षात कठोर कारवाई करून हे मार्ग कायमचे बंद करावेत,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कारवाई कधी होणार ?
प्रशासनाच्या वारंवार आश्वासनांनंतरही स्थिती जसंच्या तशी असून,प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.चोरवाटांमुळे अपघात किंवा गुन्हेगारी प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनाने बैठकीपुरती उत्तरं न देता, प्रत्यक्ष कारवाई करावी,अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या