शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
बामणोद ता.यावल प्रतिनिधी ( आर.के.इंगळे) रामेश्वर मंदिर इंदिरा नगर येथे आयोजित करण्यात येणार आहे .
बामणोद येथिल इंदिरा नगर भुसावळ रोड येथे रामेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा भाद्रपद शु. एकादशी ते भाद्रपद शु .त्रयोदशी दि. 3 सप्टेबर पासून 5 सप्टेबर पर्यंत करण्याचे योजिले आहे .
3-9-2025 बुधवार संध्याकाळी चार वाजेला नगर प्रदक्षिणा
4-9-2025 गुरुवार सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत महापुजा
5-9-2025 शुक्रवार सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत महापुजा विधी तर दुपारी दोन वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
सर्व भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व ज्या भविकांना वर्गणी द्यायची ईच्छा असेल त्यांनी श्री रामेश्वर महादेव मंदिर समितीस भेटावे असे आवाहन इंदिरा नगरवासी व समितिने केले आहे