Saturday, September 6, 2025
Homeजळगावनवयुवक गणेश मंडळाचा उपक्रम : मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

नवयुवक गणेश मंडळाचा उपक्रम : मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

नवयुवक गणेश मंडळाचा उपक्रम : मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर
फैजपूर l खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

आमोदे, ता. यावल येथील नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डॉ. साकीब फारुकी वैद्यकीय अधिकारी, हिंगोणा व डॉ. अतुल वायकोळे समुदाय आरोग्य अधिकारी, आमोदे यांनी मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन करून आरोग्य तपासणी केली.
शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी (B.P) करण्यात आली तसेच क्षयरोग (T.B), डेंग्यू व मलेरिया याविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासण्या करून घेतल्या.
विशेषतः क्षय रोग व तंबाखूविरोधी जनजागृती या शिबिराचा मुख्य भाग होता. “तंबाखू सोडा – आरोग्य जोडा”, “तंबाखूमुक्त समाज, सुदृढ भारताची ओळख” अशा घोषवाक्यांद्वारे नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
“आपले आरोग्य – आपली जबाबदारी” हा संदेश देत शिबिराचा समारोप करण्यात आला. या उपक्रमासाठी डॉ. अतुल वायकोळे समुदाय आरोग्य अधिकारी आमोदे, आरोग्य उपकेंद्र आमोदेतील सर्व आशा सेविका तसेच माजी सैनिक सुरेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते चेतन चौधरी, तेजस पाटील, हितेश चौधरी, सागर पाटील, योगेश चौधरी, कुणाल पाटील तसेच नवयुवक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचे अनमोल सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या