भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी केल्या चोरीस गेलेल्या १६ मोटार सायकली जप्त .
मध्य प्रदेशातून घेतला दोन संशयित आरोपी ताब्यात
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी गुप्त माहिती च्या आधारे मध्य प्रदेशातील संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्या कडून १६ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत .
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक राहुल वाघ व सहकारी यांनी केली आहे .
वाहन चोरीच्या गाड्या मिळाल्याची सर्वात मोठी घटना आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरात रेल्वे स्टेशन जवळील हिताची ए टी एम जवळुन त्याच्या मालकीची २०,०००/- रु. की. ची हिरो कंपनिची लाल व काळ्या रंगाची HF डिलक्स क्र. MH, १९.BV.५८८६ जु.वा.कि.अ.ही चोरी करून नेल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सि सि टी एन एस गुन्हा रजी नं ४०५/२०२०२५, भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २२/०८/२०२५ रोजी २३.३७ वा. दाखल करण्यात आला होता .
तपासादरम्यान वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असतांना गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटर सायकलबाबत तांत्रीक विष्लेशनद्वारे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीची खात्री केली असता सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी नामे काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला वय. २० रा. गारग्या ता. झिरण्या जि. खरगोण रा. मध्यप्रदेश ह मु. शाहपुर जि. बऱ्हानपुर हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपी यास शाहपुर जि. बन्हाणपुर येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर आरोपी कडे सदर
घटनेबाबत चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे राहुल रितेश चव्हाण , वय १८ , राहणार १ नं वार्ड जयभिम मोहल्ला शाहपुर जि. बऱ्हाणपुर (म.प्र.) याचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. व त्यानुसार वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल ही चोरवड ता. भुसावळ परीसरातुन हस्तगत करण्यात आली आहे. तपासादरम्यान सदर अटक आरोपी यांची वेळोवेळी पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता त्या दरम्यान त्यांनी ८,३२,०००/- रु. किमतीच्या एकुण १६ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने वेळोवेळी वरिष्टाचे मार्गदशना खाली योग्य ते पंचनामे करून सदरच्या मोटरी सायकली या जप्त करण्यात आल्या असुन जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकली मध्ये एच एफ डिलक्स , स्लेंडर , होंडा शाईन, स्लेंडर प्रो , सी टी हन्ड्रेड , प्लॅटिना व पत्सर आदी गाड्यांचा सामावेश असुन त्यांच्या गाडया चोरीस गेल्या आहेत त्यांनी बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री. संदीप गावीत, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विजय नेरकर, पो. ना सोपान पाटील, पो कॉ योगेश माळी, पो कॉ भषण चौधरी, पो कॉ प्रशांत सोनार, पो कॉ महेंद्रसींग पाटील, पो कॉ अमर अढाळे, पो. हे किरण धनगर, पो हे कॉ रवींद्र भावसार, पो कॉ सचीन चौधरी, पो कॉ जावेद शहा आदींनी केली आहे .