वरणगांव येथे अज्ञात ठिकाणी असलेले गोवंशाची पोलीसांनी केली सुटका
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव येथे अज्ञात ठिकाणी कत्तलीसाठी बांधण्यात आलेले १४ गोवंशाचे पोलिसांनी सुटका केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की वरणगांव येथे सपोनि अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांना वरणगांव येथे काही गोवंशांना बांधून ठेवल्याची माहीती मिळाली होती या अनुषंगाने
पोउपनिरी/मंगेश बेंडकोळी, सफौ नागेंद्र तायडे,
रियाज शेख यांनी प्रतिभा नगर स्मशान भूमीजवळ घटना स्थळी भेट दिली असता झाडा झुडूपात
एकुण १४ गोवंश जातीचे जनावरे चारापाण्याची सोय न करता कत्तल करण्याचे उद्देशाने कोणीतरी अज्ञात ईसमाने बांधुन ठेवलेले दिसले .
गोवंश जनावरे ही कोणी बांधले आहेत याबाबत आजु बाजुला चौकशी करता कोणीही मिळुन आलेले नाही अगर कोणीही सदर जागी हजर झाले नाही , तेव्हा पोलीसांची खात्री झाली आहे की सदरची गोवंश जनावरे ही कत्तल करण्याचे उद्देशाने कोणीतरी अज्ञात ईसमाने बाधुन ठेवले होते
या प्रकरणी पो कॉ उमेश बारी यांच्या फिर्यादी वरून सफौ रियाज शेख यांनी वरणगांव पोलीस स्टेशनला CCTNS गुरनं 192/2025 महा प्राणी अधि. 1976 (सुधारीत कायदा 2015) चे क. 5,9 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनी बागुल यांच्या आदेशाने सफौ नागेंद्र तायडे हे करीत आहेत.