Saturday, September 6, 2025
Homeजळगावडॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार

डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार

डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार

भुसावळ –       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना शिक्षणक्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.

संगमनेर येथील जनआरोग्यम् परिवार संचलित जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन हा पुरस्कार संगमनेर येथील थोरात महाविद्यालयात डॉ. जगदीश पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सोमनाथ कळसकर गुरूजी, फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित पाटणकर, उपाध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, सचिव अंतोन मिसाळ, समन्वयक संदीप काकड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बालभारती अभ्यास मंडळ सदस्य, एससीईआरटी शिक्षक प्रशिक्षण साहित्य निर्मिती, विविध शिक्षक प्रशिक्षणात राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा निर्मिती यासह राज्यस्तरावरील विविध शैक्षणिक कार्यात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील यांची राज्यभरातून एकमेव निवड करून त्यांना लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार 2025 हा पुरस्कार माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संगमनेर येथील कलाशिक्षक विजय पवार यांनी आपल्या सिद्धहस्त कौशल्यातून पेन्सिलीने रेखाटलेले डॉ. जगदीश पाटील यांचे रेखाचित्र माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व कलाशिक्षक विजय पवार यांच्या हस्ते डॉ. जगदीश पाटील यांना सप्रेम भेट देण्यात आले. यातून शिक्षण व कलेचा सुरेख संगम दिसून आला. डॉ. जगदीश पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या