Friday, September 5, 2025
Homeजळगावयावल येथील श्री सदस्यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी १२ क्विंटल निर्माल्य संकलन करून...

यावल येथील श्री सदस्यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी १२ क्विंटल निर्माल्य संकलन करून विधीवत विल्हेवाट केली.

यावल येथील श्री सदस्यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी १२ क्विंटल निर्माल्य संकलन करून विधीवत विल्हेवाट केली.

यावल दि. २     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     यावल शहरातील व पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांनी,तसेच घराघरात श्री गणेश स्थापना करणाऱ्या हजारो भक्तांनी रविवार दि. ३१ रोजी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात,आनंदात केले असता विसर्जनाच्या वेळी जे निर्माल्य विसर्जनाच्या ठिकाणी फेकले जाते ते विविध ठिकाणचे एकूण १२ क्विंटल निर्माल्य यावल येथील परिसरातील एकूण २०० श्री सदस्यांनी संकलन करून त्याची विधिवत विल्हेवाट लावली.

गणेशोत्सव मंडळाकडून विसर्जन करताना निर्माल्य वस्तूची हेळसांड होऊ नये,कोणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून तसेच निर्माल्य याची पवित्रता टिकून राहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सूचनेनुसार यावल येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर परिसरातील तसेच यावल भुसावळ रोडवरील पाटाजवळ,शेळगाव बॅरेज रस्त्यावरील पाटा जवळील निर्माल्य अट्रावल,मनवेल,दहिगाव, परिसरातील एकूण २०० सदस्यांनी १२ क्विंटल निर्माण संकलन करून त्याची विधिवत विल्हेवाट लावली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या