Friday, September 5, 2025
Homeजळगावयांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता स्थानिक रहिवासी असल्याने पदाचा दुरुपयोग.

यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता स्थानिक रहिवासी असल्याने पदाचा दुरुपयोग.

यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता स्थानिक रहिवासी असल्याने पदाचा दुरुपयोग.

सुरक्षारक्षकांनी केली तक्रार.

यावल दि.२  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सुरक्षा रक्षक म्हणून सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी करताना जळगाव येथील यांत्रिकी उपविभाग नशिराबाद कार्यकारी अभियंता हे स्थानिक रहिवासी असल्याने ते आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आहेत अशी लेखी तक्रार सुरक्षा रक्षकांनी केली आहे.
१ सप्टेंबर २०२५ रोजी सचिन नारायण ठाकरे,धीरज किरण भालेराव,चेतन दगडू भंगाळे,संजय गौतम सोनवणे,गिरीश नगीना केऱ्हळकर,वाल्मीक अनिल सोनवणे,अमर सुरेश सपकाळे या सात सुरक्षारक्षकांनी नाशिक येथील यांत्रिकी विभाग अधीक्षक अभियंता यांच्याकडे दिलेल्या तक्रारी त नमूद केले आहे की,

सुरक्षा रक्षक म्हणून आपले अधिपत्याखाली असलेल्या
यांत्रिकी विभागीय पथक जळगांव आंतर्गत यांत्रिकी उपविभाग नशिराबाद (जामनेर) अंतर्गत कडगांव प्रकल्प स्थळी कार्यरत सयंत्रे व वाहने देखरेखीकरीता जानेवारी २०२५ पासून दि.१८ जुलै २०२५ पर्यंत कार्यरत होतो. दि.१८ जुलै २०२५ रोजी आमची सुरक्षा रक्षक म्हणून सेवा खंडीत करण्यात आली आहे.तदनंतर आम्ही धुळे जिल्हा सुरक्षा मंडळ आंतर्गत धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्हयाव्दारा
सहाय्यक कामगार आयुक्त राजेंद्र भवन,स्वामी विवेकानंद नगर, जळगांव यांना या बाबत
दि.२३ जुलै २०२५ रोजी पत्र दिले आहे.
त्यानुसार निरीक्षक धुळे जिल्हा सुरक्षा मंडळ (अंतर्गत जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्हे ) जळगांव यांनी कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभागीय पथक जळगांव यांना सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे परंतु कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभागीय पथक जळगांव हे स्थानिक रहीवासी असल्याने ते त्यांचे पदाचे दुरुउपयोग करीत आहेत.असे
वाटते.शासनाचे निर्णय सुध्दा न मानता चौकीदार,सुरक्षा रक्षक यांची नेमणूक बाबत निविदा काढतात. तरी आपणांस नम्र विनंती करण्यात येते की, आपले स्तरावर योग्य ती कारवाई करावी.
अन्यथा तापीपाटबंधारे विकास महामंडळ जळगांव कार्यालया समोर दि.२३ सप्टेंबर २०२५ पासून साखळी उपोषण करण्यात येईल. कार्यकारी अभियंता धनंजय
पाटील हे जळगांव जिल्हयातील स्थानिक रहीवासी असल्यामुळे त्यांचेकडून आमचे जिवास धोका होऊ शकेल. उपोषणा दरम्यान आमचे काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता हे राहतील हे आपल्या माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सादर करीत आहे. या दिलेल्या तक्रार अर्जावर सुरक्षा रक्षकांनी स्वाक्षरी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या