Friday, September 5, 2025
Homeजळगावजाडगाव अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष चिंताजनक

जाडगाव अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष चिंताजनक

जाडगाव अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष चिंताजनक

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              वरणगाव, ता. भुसावळ (दि. २) –
भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील अंगणवाडी केंद्रात अस्वच्छता, सुविधा अभाव, आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाल्या असून देखील प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात आले आहे.

अंगणवाडीच्या आवारात नागरिक खुले शौच करत असून, दारू पिऊन बेवारसपणे फिरणाऱ्यांचा वावरही वाढला आहे. परिसरात कचरा, काचांचे तुकडे, काटेरी झुडपे आणि गवत वाढल्यामुळे लहान मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे. गेट तुटले असून संरक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

अंगणवाडीच्या भिंतीलगत गुरांचे गोठे तयार झाले असून, दुर्गंधीने परिसर दूषित झाला आहे. नुकतीच दुरुस्ती होऊनही छताला गळती लागल्याने कामाच्या निकृष्टतेचा मुद्दा समोर येतो.अजूनही या अंगणवाडीत वीज मीटर बसवले गेलेले नाही.सन१९९४ मध्ये स्थापना झाल्यापासून आजतागायत विद्यार्थ्यांना अंधारातच शिक्षण घ्यावे लागत आहे,ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.

याशिवाय अंगणवाडीच्या प्रवेशद्वाराजवळ रेतीचे ढीग टाकले गेल्याने विद्यार्थ्यांना, सेविका आणि पालकांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.यासंदर्भात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत आणि बाल प्रकल्प विभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत.मात्र, प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्या आहेत.स्थानिक नागरिक व पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, वरिष्ठ बाल प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या