श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचा जनहिताय उपक्रम –
निमित्त महाराजांच्या वाढदिवसाचे मात्र विविध उपक्रम समाजाभिमुख फैजपूर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले येथील श्री सतपंथ मंदिर संस्थानच्या अंतर्गत गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी श्री सतपंथ चारिटेबल ट्रस्टची स्थापना करून या ट्रस्ट तर्फे वर्षभरात निव्वळ धार्मिक कार्यक्रम आयोजित न करता जनसेवेचे व्रत अंगीकारून काळानुरूप सामाजिक कार्य करीत आहे. दरवर्षी दि. २८ ऑगस्ट रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त विविध

कार्यक्रम आयोजित केले जात असतात. यावर्षी तुलसी हेल्थकेअर सेंटरच्या नवीन प्राकृतिक चिकित्सा विभागाचे लोकार्पण प. पु. जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वराचार्यजी महाराज, तीर्थधाम प्रेरणापीठ यांच्या हस्ते करण्यात आले. लाखो रुपयांची उधळपट्टी न करता एक एक पै चा हिशोब ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने धर्मकार्यासोबत समाजातील गोरगरिबापासून तर सर्वांसाठी उपयुक्त असे नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतले जातात यात महाराजांचा हातखंडा आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने असंख्य रक्तदात्यांसह त्यांनी स्वतः रक्तदान करून ९६२ रक्त दात्यांनी रक्तदान करून महाराजांची रक्ततुला केली. असे एकमेव उदाहरण परिसरात एकावयास मिळते. यासाठी फैजपूर येथे सतपंथ मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. याशिवाय त्यांच्या भाविक भक्तांनी वढोदा, बोदवड, संभाजीनगर, नांदुरा या ठिकाणी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन शेकडो रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यासाठी अनेक रक्तपेढ्या संस्थांनी सहकार्य केले. याशिवाय जामनेर येथे १०१ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यात गरीब तथा गरजू रुग्णांच्या डोळ्याचे ऑपरेशन मोफत करण्याची सोय करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराजांची फळ तुलाही करण्यात आली. यासाठी आलेल्या विविध प्रकारच्या फळांचे वाटप गरीब रुग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन करण्यात आले. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त हजारो भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले. याच दिवशी आचार्य सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांना नॅचरोपॅथी व योगा विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.

महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचा वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी एक आनंददायक पर्वणीच असते. अनाठाई पैसा खर्च न करता समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने विविध समाज उपयोगी कार्य केले जाते. याचबरोबर दर बुधवारी दरिद्री नारायण यांना पोट भरून मिष्ठांन्न दिले जाते. त्यामुळे महाराजांचे नाव देशपातळीवर पूजनीय आहे. महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त देशभरातून संत महंत, सर्व जाती धर्माचे तथा राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेले मान्यवर, शिष्य गण या कार्यक्रमास पुढीलप्रमाणे उपस्थित होते.
– पंचक्रोशितिल पूजनीय संतगण प. पू. गोपाल चैतन्य जी महाराज पाल, प. पू. शास्त्री मानेकर बाबा सावदा, प. पू. श्याम चैतन्य जी महाराज जामनेर, योगी दत्तनाथ बाबा शिंदखेडा, हभप रविंद्र महाराज हरणे मुक्ताईगर, संत स्वरूपानंद महाराज डोंगरदे, अनंत प्रकाश शास्त्री गुरुकुल सावदा, ह भ प नितीन महाराज मलकापूर, सर्वचैतन्य महाराज कन्नड आश्रम, आरोग्य तज्ञ आचार्य सचिन जी पाटील, परम शिष्य प्रवीण भाई यांच्यासह ना. प्रतापरावजी जाधव, केंद्रीय आरोग्य मंत्री, श्रीमती
रक्षाताई खडसे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री, आ. एकनाथराव खडसे, खा. श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव, आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) जळगाव, ना. संजयजी सावकारे वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र, आ. अमोल जावळे यावल रावेर, खा. ज्ञानेश्वरजी पाटील खंडवा, मध्यप्रदेश, आ. अर्चनादीदी चिटणीस बुरहानपुर, आ. चंद्रकांतजी पाटील मुक्ताईनगर, आ. किशोरजी पाटील पाचोरा, आ. अमोल पाटील एरंडोल, आ. मंगेश चव्हाण चाळीसगांव, आ. चंद्रकांत सोनवणे चोपड़ा, आ. मंजू दीदी नेपानगर मध्यप्रदेश, माजी आ. शिरीषदादा चौधरी, डॉ. केतकीताई पाटील जळगाव, बबनराव काकडे प्रांताधिकारी फैजपूर, बंडू कापसे तहसीलदार रावेर, सौ.मोहनमाला नाझिरकर तहसीलदार यावल, अशोक नखाते अतिरिक्त पोलीस अधीक्षक जळगाव, अनिल बडगुजर (डि वाय एस पी, फैजपूर), एपीआई विशाल जयस्वाल, एपीआई विशाल पाटील सावदा, एपीआई रामेश्वर मोताळे फैजपूर, एपीआई हरिदास बोचरे, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

