“वर्दीतला माणूस” ठरला मार्गदर्शक सपोनि बागुल यांचे मंडळात प्रेरणादायी मार्गदर्शन
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ दि. 3 सप्टेंबर :
“माणूस उभा आहे वर्दीतला… म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला”, या ओळी जणू आज खऱ्या ठरल्या.स्वराज्य मित्र मंडळ,नारीमळा नगर,वरणगाव येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय अमित कुमार बागुल यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरले ते बागुल साहेबांचे विद्यार्थ्यांशी थेट संवाद व मार्गदर्शन. त्यांनी उपस्थित लहान कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेक, OTP फ्रॉड,ऑनलाईन गेम्सचे दुष्परिणाम,शैक्षणिक मार्गदर्शन, वाहतूक नियम,चांगल्या-वाईट सवयी,शिस्त आणि अभ्यास या विषयांवर सहज भाषेत समजावून सांगितले.
बागुल साहेबांनी मुलांशी संवाद साधताना त्यांना जीवनातील शिस्त,अभ्यासाची गरज आणि तांत्रिक युगातील सावधगिरी यांची जाणीव करून दिली.त्यांच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही भारावून गेले.
कार्यक्रमास नारीमळा नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही बागुल साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले आणि असे सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम दरवर्षी घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.