Friday, September 5, 2025
Homeगुन्हावरणगाव पोलिसांची कारवाई : झाडाझुडपात लपवलेली गावठी दारू भट्टी उध्वस्त, ४३ हजारांचा...

वरणगाव पोलिसांची कारवाई : झाडाझुडपात लपवलेली गावठी दारू भट्टी उध्वस्त, ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

वरणगाव पोलिसांची कारवाई : झाडाझुडपात लपवलेली गावठी दारू भट्टी उध्वस्त, ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         वरणगाव ता भुसावळ दि ४सप्टेंबर :
वरणगाव पोलिसांनी बुधवार रोजी सकाळी गुप्त माहितीच्या आधारे बोहर्डी खुर्द शिवारात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीवर छापा टाकला.झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या दारू भट्टीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एकूण ₹४३,२५०/- किमतीचा अवैध दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत रविंद्र ज्ञानदेव गोपाळ (वय ४०, रा. बोहर्डी बु., ता. भुसावळ) या इसमास अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई –
सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास सपोनि अमितकुमार बागुल यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,बोहर्डी खुर्द शिवारातील हरताळा रोडजवळील नाल्याच्या काठावर झाडाझुडपात रविंद्र गोपाळ नावाचा इसम गावठी हातभट्टीच्या साहाय्याने बेकायदेशीर रित्या दारू तयार करत आहे.
सदर माहिती खात्रीशीर असल्यामुळे सपोनि बागुल यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशांत ठाकुर, यासीन पिंजारी, मनोज म्हस्के,चालक पोलिस उपनिरीक्षक इस्माइल शेख,तसेच दोन पंचांसह पोलिसांची टीम सरकारी वाहनासह घटनास्थळी रवाना झाली.
छापा टाकून आरोपीला रंगेहाथ पकडले –
पोलिस पथकाने वाहन रस्त्यालगत उभे करून काही अंतर पायी चालत जाऊन नाल्याजवळ पोहोचले.बातमी प्रमाणे ठिकाणाची दुरून खात्री घेतली असता, झाडाझुडपात एका चुलीवर दोन पत्र्याचे ड्रम ठेवून त्यात रसायन ढवळताना एक इसम दिसून आला.पोलिसांनी लगेच छापा टाकून त्याला पकडले.पंचासमक्ष विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव रविंद्र ज्ञानदेव गोपाळ असल्याचे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या