गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती
वरणगव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरात गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान पाईपलाईन कामामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले होते. या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते महेश सपकाळे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना निवेदन देत तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.
आगामी गणेश विसर्जन, दुर्गा उत्सव व ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पालिकेने सदर निवेदनाची दखल घेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कच टाकून दुरुस्ती केली आहे. मात्र ही दुरुस्ती किती काळ टिकेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.