,वरणगांव जवळ गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद…
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव जवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पथकास जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्र वापरत आहेत. सदर बाबत गोपनीय माहीती काढुन अश्या लोकांवर कारवाई करा असे आदेश दिले होते.
या आदेशानुसार राहुल गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, स्था.गु.शा यांना गोपणीय रित्या दिनांक ०४/०५/२०२५ रोजी गोपनीय बातमी मिळाली की, चरणसिंग चव्हाण व पंकज चव्हाण हे काळ्या लाल रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक MP-६८-ZC-३३५७ वरणगांव शहरातील फुलगाव ब्रीज च्या खाली गावठी कट्टासह दहशत माजविण्याच्या उद्देशाने येणार आहे.
त्याप्रमाणे गणेशोत्सव सण लक्षात घेवुन एक पथक तयार करुन पथक घटना स्थळी पोहचले असता वरील क्रमांकाची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक MP-६८-ZC-३३५७ हि त्यावर दोन संशयीत इसम यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) चरणसिंग उखा चव्हाण वय-३६ रा-चौडी ता-जि-ब-हाणपुर (म.प्र) २) पंकज रतनसिंग चव्हाण वय-२५ रा-मोरझिरा ता-मुक्ताईनगर जि-जळगांव असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावटी बनावटीचा पिस्तोल व २ जिवंत काडतुस तसेच काळ्या लाल रंगाची पल्सर मोटार सायकल व दोन मोबाईल असा अंदाजे १,२९,०००/ रु किंमतीचा मुद्देमाल विनापास परवाना बेकायदेशिर पणे दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे .
संशयितास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द वरणगांव पोलीस स्टेशनला CCTNS NO १९४/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. जळगाव यांचे मागर्दशनाखाली उप निरीक्षक श्री सोपान गोरे, पोह, यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे, चा पोह भरत पाटील सर्व नेम-स्था.गु.शा जळगांव यांनी केली आहे.