Friday, May 1, 2026
Homeजळगावदस्त नोंदणी करणे करिता अँटी करप्शन आणि कलेक्टर ऑफिसला हप्ते द्यावे लागतात...?

दस्त नोंदणी करणे करिता अँटी करप्शन आणि कलेक्टर ऑफिसला हप्ते द्यावे लागतात…?

दस्त नोंदणी करणे करिता अँटी करप्शन आणि कलेक्टर ऑफिसला हप्ते द्यावे लागतात…?

जिल्हाधिकारी,अँटी करप्शनकडे लेखी तक्रार दाखल.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दि.७  दस्त नोंदणी करणे करिता अँटी करप्शन ऑफिस व कलेक्टर ऑफिस यांना हप्ते द्यावे लागतात म्हणून सदर दस्ताचे तुम्ही ५ हजार रुपये द्या त्याशिवाय दस्त देणार नाही.असे दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त करून घेणाऱ्याला सांगितल्याने संबंधित व्यक्तीने जिल्हाधिकारी जळगाव आणि अँटीकरप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली.
तालुक्यातील सांगवी बु.येथील दीपक छगन कोळी यांनी गुरुवार दि.४ सप्टेंबर २०२५ जिल्हाधिकारीआणि अँटीकरप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,तालुक्यातील सांगवी बु.येथील घर जागेचे विना मोबदला हक्क सोडपत्र नोंदणी केली,परंतु सदरचा दस्त पेंडिंग राहिलेला होता म्हणून आम्ही २ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी पूर्ण केली आहे.आणि नोंदणी झालेला दस्त दि.३ सप्टेंबर रोजी मागणी करण्यासाठी कार्यालयात गेलो असता दुय्यम निबंधक यांनी नोंदणी झालेला दस्त देण्यासाठी नकार दिला.सदरचा दस्त हा पेंडिंग होता नंतर पूर्ण झाला आहे. तसेच दस्त नोंदणी करणे करता मला अँटीकरप्शन आणि कलेक्टर ऑफिस जळगावला हप्ते द्यावे लागतात म्हणून सदर दस्ताचे तुम्ही मला ५ हजार रुपये द्या त्याशिवाय नोंदणी झालेला मी दस्त देणार नाही असे दुय्यम निबंधक यांनी अर्जदार दीपक छगन कोळी यांना सांगितले.दुय्यम निबंधक यांनी ५ हजार रुपयाची मागणी करून अँटी करप्शन ब्युरो जळगाव आणि कलेक्टर ऑफिसचे नाव बदनाम केले आहे,
सदर घटनेच्या वेळी कार्यालयात जाताना माझ्या सोबत संबंधित स्टॅम्प वेंडर्स,सोबतचा मित्र आकाश तायडे हे होते त्यांच्या समक्ष दुय्यम निबंधक यांनी ५ हजार रुपयाची मागणी केली. तसेच सदरचा दस्त मिळावा व दुय्यम निबंधक यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी दीपक छगन कोळी यांनी केली आहे.अशा प्रकारचा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी जळगाव आणि अँटीकरप्शन ब्युरो जळगाव यांच्याकडे शपथ पत्रासह केल्याने दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही होणार किंवा नाही याकडे तक्रारदार यांचे लक्ष वेधून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या