Friday, May 1, 2026
Homeजळगावबामणोद येथे गणपती विसर्जन शांततेत संपन्न

बामणोद येथे गणपती विसर्जन शांततेत संपन्न

बामणोद येथे गणपती विसर्जन शांततेत संपन्न

बामणोद  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आर के इंगळे                                                                            ता. यावल येथे गणपती विसर्जन शांततेत पार पडले आहे .
बामणोद येथे सकाळी दहा वाजेपासून विसर्जन मिरवणूकांची सुरुवात करण्यात आली .
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या . एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला अशा विवीध घोषणा देत गणेश भक्तांनी पुर्ण ऊत्साहात व भक्तिभावाने गणपती बाप्पा ला निरोप दिला .

 

Oplus_131072

विवीध मंडळांतर्फे महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते .
दांडीया खेळून तसेच गुलाल ऊधळून ढोल ताशे व बॅन्ड व डी.जे.च्या तालावर गणपती बाप्पाचे तापी नदीमधे विसर्जन करण्यात आले आहे .
यावेळी ए एस आय संजय झाल्टे ,पी एस आय निरज बोकिल , पोलीस हवालदार मोती पवार, विकास सोनवणे व इतर कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .
गणपती बाप्पाचे विसर्जन शांततेत पार पडले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या