Tuesday, October 13, 2026
Homeजळगावके. एन. सी. टी. आय. संस्थेमार्फत संगणक शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न

के. एन. सी. टी. आय. संस्थेमार्फत संगणक शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न

के. एन. सी. टी. आय. संस्थेमार्फत संगणक शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न

भुसावळ.  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

दिनांक 5 सप्टेंबर 2025 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून के. नारखेडे कॉम्पुटर टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत संगणक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर के. नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी भुसावळ या संस्थेचे सेक्रेटरी श्री. पी. व्ही. पाटील, संस्थेचे सह सेक्रेटरी श्री. विकास पाचपांडे , संस्थेचे कार्यकारिणी सभासद श्री. प्रमोद नेमाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संगणक विभाग प्रमुख श्री. बी. ए.पाटील सर व संस्थेचे भाऊसाहेब श्री. प्रमोद तळेले यांच्यासह विभागातील इतर सर्व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात श्री. पी. व्ही. पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उत्तम दर्जेदार संगणक शिक्षण देण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. पी. पाठक सर हे सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. या आजच्या कार्यक्रमास के.एन.सी. टी. आय. चे अध्यक्ष डॉ.श्री. मकरंद नारखेडे , उपाध्यक्ष श्री. किशोर नारखेडे , खजिनदार श्री. श्रीनिवास नारखेडे , कार्यकारिणी सभासद श्री. संजीव नारखेडे या सर्वांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारिका भारंबे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे यादी वाचन व आभार प्रदर्शन सौ. वंदना वारके मॅडम यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या