भुसावळात अनिस शाखेची बैठक : प्रदूषण आणि अंधश्रद्धेवर प्रभावी चर्चा
भुसावळ. खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी , ता. ५ सप्टेंबर :
भुसावळ येथील तापी रोडवरील रेस्ट हाऊसमध्ये आज दुपारी ३.३० वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) शाखेची महत्वाची बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष मा. सुमंगल आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाजहिताच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत नदीत निर्माल्य टाकण्यामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण हा मुख्य विषय ठरला. यावर उपाययोजना म्हणून नगरपालिका व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय, सध्या समाजात विविध माध्यमांतून अंधश्रद्धा पसरविण्याचे षड्यंत्र रचले जात असून त्याविरोधात व्यापक जनजागृतीची गरज असल्यावर बैठकीत भर देण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लवकरच व्याख्याने, जनजागृती कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस अरुण दामोदर,श्यामकुमार वासनिक,शांताराम जाधव,राजेश तायडे,नरेश वाघ,सिद्धार्थ सोनवणे,विजय बाऱ्हे, सुभाष लोखंडे,अंजना,नीलेश गुरूचल,आनंद मित्र, नरहरी वासनिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

