Monday, September 8, 2025
Homeगुन्हाखंडाळा येथे शेती रस्त्यावरून एकास मारहाण गुन्हा दाखल

खंडाळा येथे शेती रस्त्यावरून एकास मारहाण गुन्हा दाखल

खंडाळा येथे शेती रस्त्यावरून एकास मारहाण
गुन्हा दाखल

भुसावळ          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            दि 7

तालुक्यातील खंडाळा गावात शेतातील बैलगाडी रस्त्यावरुन ये-जा केल्याच्या कारणावरुन एकास मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
या प्रकरणी दोन जणांविरुद्ध रविवारी ( ७ सप्टेंबर) रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दिगंबर पाटील यांनी शेतातील बैल गाडी च्या रस्त्यावरुन ये-जा केली. या कारणावरुन भुषण प्रकाश पाटील व विशाल प्रकाश पाटील या दोघांनी प्रकाश पाटील यांना मारहाण केली.
या मारहाणीत प्रकाश पाटील यांच्या दात तुटला तसेच ते गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरुन भुषण पाटील आणि विशाल पाटील याच्या विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर विसपूते करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या