Tuesday, September 9, 2025
Homeजळगावशहरातील नाट्यगृहात रंगली मद्य, मांसाहाराची पार्टी !

शहरातील नाट्यगृहात रंगली मद्य, मांसाहाराची पार्टी !

शहरातील नाट्यगृहात रंगली मद्य, मांसाहाराची पार्टी !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहराची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याऱ्या बालगंधर्व खुले नाट्य गृहात रविवारी थेट मद्य व मांसाहार पार्टी रंगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिस पोहोचले असता चार जणांनी पळ काढला, मात्र दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे बालगंधर्व खुले नाट्यगृह साक्षीदार आहे. या ठिकाणी नाट्य कलाकृतींच्या सादरीकरणासह विविध धार्मिक कार्यक्रमही होत असतात या नाट्यगृहासह अनेक सभागृहांचे व्यवस्थित जतन होत नसल्याची खंत नाट्यकलावंताकडून व्यक्त होत असते. त्यात बालगंधर्व खुले नाट्यगृहाची विटंबना करणारा प्रकार या ठिकाणी घडला. रंगकर्मी होनाजी चव्हाण यांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी पार्टी करीत आहे की काय? या शक्यतेने महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले, बांधकाम अभियंता आर.टी. पाटील हे बालगंधर्व नाट्यगृहात पोहचले. त्या ठिकाणी मद्याच्च्या बाटल्या, मांसाहार असल्याचे त्यांना आढळून आले. मात्र ते मनपा कर्मचारी नाही तर अनोळखी व्यक्ती निघाले, असे बोरोले यांनी सांगितले. याच वेळी जिल्हा पेठ पोलिसही तेथे दाखल झाल्याने त्यांना पाहून चार जणांनी पळ काढला तर दोन जण हाती लागले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मनपाचा कोंडवाडा असलेल्या बाजूचा नाट्यगृहाचा दरवाजा उघडा असल्यामुळे हे मद्यपी बालगंधर्व सभागृहात शिरले आणि तेथे पार्टी करीत असल्याचा संशय आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या