Monday, September 8, 2025
Homeजळगावअनंत चतुर्दशी निमित्त शहरात विसर्जन : भुसावळात मिरवणुकांचे उत्साही आणि शांततेत आयोजन

अनंत चतुर्दशी निमित्त शहरात विसर्जन : भुसावळात मिरवणुकांचे उत्साही आणि शांततेत आयोजन

अनंत चतुर्दशी निमित्त शहरात विसर्जन : भुसावळात मिरवणुकांचे उत्साही आणि शांततेत आयोजन

भुसावळ             खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          , दि ७ सप्टेबर :
भुसावळ शहरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात,भक्तिभावाने आणि शांततेत पार पडले.दहा दिवस घराघरांत, मंडळांत मोठ्या श्रद्धेने पूजन केलेल्या गणरायाला “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात निरोप देण्यात आला.

यंदा एकूण ४८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शहरातून काढण्यात आल्या.ढोल-ताशांच्या गजरात,फटाक्यांच्या आवाजात,गुलालाची उधळण करत भक्तिमय वातावरणात या मिरवणुका पार पडल्या. शहराच्या विविध भागांत रोषणाईने सजवलेले रस्ते आणि मंडप लक्षवेधी ठरत होते.

 


मिरवणूकीत प्रथम गणपतीचे पुजन वस्रोदयोग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आली

घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी १०,००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन तापी नदीच्या इंजन घाट, महादेव वाडा, जुना यावल-भुसावळ रोड परिसरात करण्यात आले. भक्तांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी दानशूर व्यक्तींनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते, जेथे भाविकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

भुसावळ तालुका पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पीआय राहुल वाघ,शहर पोलीस स्टेशनचे पीआय, तालुका पोलीस स्टेशनचे पीआय महेश गायकवाड,वाहतूक विभागाचे पीआय उमेश महाले यांनी सुरक्षेची चोख व्यवस्था राखली.होमगार्ड,एसआरपी, शांतता समितीचे सदस्य व पोलीस मित्रांचीही प्रभावी मदत लाभली.
यावेळी तहसीलदार निता लबडे ‘व नगरपालीका अधिकारी राजेंद्र फातले माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे , माजी नगरसेवक किरण कोलते , युवराज लोणारी , व नगरपालीका कर्मचारी उपस्थित होते .

 

मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस, होमगार्ड यांचे विशेष पथक तैनात होते. सर्व विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध व शांततेत पार पडल्या, याबद्दल नागरिक आणि मंडळांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गणपती बाप्पाच्या निरोपाच्या वेळी अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळताना दिसले, मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या आशेने उत्साहही ओसंडून वाहत होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या