यावल येथील बाबूजीपुरा भागातील पाच वर्षीय बालकाची निर्दयपणे हत्या करून मृतदेह कोठीत टाकला.
आरोपीला ८ दिवसाची पोलीस कोठडी.
यावल दि.७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहरातून २ दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह त्याच्या घरासमोरील शेजारच्या घरात कोठीत जळालेल्या स्थितीत सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या अमानुष व हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे यावल शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे तसेच नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.या संताप जनक घटनेतील संशयित २२ वर्षीय आरोपीला आज यावल येथील प्रथम वर्ग न्यायाधीश आर.एस. जगताप यांच्या कोर्टात हजर केले असता आरोपीला सोमवार दि.१५ सप्टेंबर २०२५ ट्रेनच्या पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.
यावेळी न्यायालयाच्या बाहेर नगरपालिका कार्यालयासमोर मोठा जनसमुदाय उपस्थित झाला होता.
मृत मुलाचे नाव अब्दुल हन्नान मजित खान (वय ६, रा. बाबूजीपुरा, यावल) असे आहे.हा मुलगा एकुलता एक असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईने वडिलांना आपली किडनी दान करून जीवनदान दिल्याची हृदयस्पर्शी बाब उघडकीस आली आहे.या कुटुंबावर आता दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे.
सहा वर्षीय बालक हा शुक्रवार दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी घरातून बेपत्ता झाला होता.त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी, नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र शनिवारी सकाळी शेजाऱ्याच्या बिस्मिल्लाह खलिफा यांच्या घरातून मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आणि एका कोठीत आढळून आला.या क्रूर संताप जनक घटनेमुळे शहरासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने नागरिकांचा जनसमुदाय घटनेच्या ठिकाणी जमा झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घर सील केले व लहान बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात या प्रकरणी संशयित आरोपीवर विविध गंभीर अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून आहे.
भाजपाचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ जावळे यांनी आज मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
खरे कारण काय..?
शुक्रवार दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद हा उत्सव मोठ्या उत्साहात शांततेत पार पडला या प्रचंड गर्दीची संधी साधून आरोपीने पाच वर्षीय बालकाचे अपहरण केले, मुलगा बेपत्ता कसा झाला.? कोणी त्याचे अपहरण केले.? याबाबत शोधाशोध करताना दुसऱ्या दिवशी शनिवारी मुलाचा मृतदेह मृत मुलाच्या घरासमोर शेजारी आरोपीच्या घरात एका कोठीत आढळून आला.मृत बालकाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करून शनीवार दि.६ रोजी संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपीने पाच वर्षीय बालकाची अत्या नेमकी कोणत्या कारणाने केली याबाबत मात्र यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी चौकशी अंती खरे कारण लवकरच समोर येईल अशी चर्चा संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात आहे.