Tuesday, September 9, 2025
Homeजळगावपंचवीस हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, शांती-भाईचाऱ्याचा संदेश

पंचवीस हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, शांती-भाईचाऱ्याचा संदेश

भुसावळ शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा ऐतिहासिक उत्सव उत्साहात संपन्न

– पंचवीस हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, शांती-भाईचाऱ्याचा संदेश

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ येथे पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव शोभायात्रेने जल्लोषात साजरा करण्यात आला .
सकाळी ९ वाजता अमरदीप चौकातून सुरुवात झालेल्या या ऐतिहासिक जुलूसचा समारोप दुपारी ३ वाजता नगरपालिका उर्दू शाळा क्र.३ येथे करण्यात आला.

या जुलूसमध्ये शहर व ग्रामीण भागातील सुन्नी मशिदींचे अनेक मौलाना सहभागी झाले. त्यामध्ये
मौलाना अब्दुल हकीम ,मौलाना मुफ्ती नजीर ,मौलाना हाफिज लुकमान ‘मौलाना शाहिद , मौलाना सोफियान ,मौलाना हाफिज सुलतान ,मौलाना कलीम
मौलाना गुलाम सर्वर ,मौलाना अब्दुल्ला ,मौलाना हाफिज अन्वर
मौलाना कासिम ,यांचा समावेश होता. त्यांनी जुलूसच्या विविध ठिकठिकाणी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

गोशिया नगर यंग ग्रुपचा विशेष उपक्रम

जुलूसच्या शेवटच्या टप्प्यात गोशिया नगर यंग ग्रुपने समाजसेवेचा अनोखा नमुना ठेवला.
या ग्रुपचे सदस्य – शेख रफिक, शेख आफताब, रोशन पिंजारी, अजित मणियार, अन्सार मणियार, अमित पिंजारी, अल्ताफ पिंजारी, मुस्तफा खाटीक, शेख शाहरुख बागवान, जहांगीर मणियार आदींनी जुलूस मार्गाची स्वच्छता करून पैगंबरांच्या शिकवणीचा प्रत्यक्ष अंमल दाखवला.
स्वच्छ भारत अभियानाला दिलेला हा प्रत्यक्ष हातभार समाजबांधवांत चर्चेचा विषय ठरला.

प्रस्तुत जुलूसचा खडका गाव → रजा टॉवर → अमरदीप चौक → आगाखान वाडा → शिवाजीनगर → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा → मॉर्डन रोड → गांधी चौक → सराफ गल्ली → महालक्ष्मी चौक → जामा मशिद → जाम मोहल्ला → कलाली वाडा → भीसती गल्ली → मच्छी वाडा → अमरदीप चौक → नगरपालिका उर्दू शाळा क्र.३ याप्रमाणे होता.

या मिरवणुकीत आगवाली चाळ परिसरातील मुस्लिम बांधवांनी मदिना येथील पवित्र मशिदीच्या मनोऱ्याची प्रतिकृती देखावा सादर केला होता.

या मिरवणुकीत लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व मुस्लिम समाजबांधवांनी सहभाग घेतला.

सर्वांनी पांढरे शुभ्र कुर्ता-पायजमा परिधान केले होते.

लहान मुलांनी हिरव्या रंगाचे फेटे बांधले होते.

मिरवणुकीत अंदाजे २५ हजारांहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली.

जुलूसच्या मार्गावर ठराविक ठिकाणी समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारून
चहा, पाणी, शरबत,
मिठाई, लाडू, पेढे, खीर
यांचे वाटप केले.
विशेष म्हणजे हे वाटप केवळ सहभागी बांधवांनाच नव्हे, तर मार्गावरून जाणाऱ्या इतर समाजाच्या नागरिकांनाही करण्यात आले.

 

जुलूसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंग ग्रुपने विविध चौकांवर मोठ्या प्रमाणात तिरंगा फडकावून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला.
पांढरे कपडे, हिरवे फेटे आणि तिरंगी झेंडे या दृश्यांनी शहर रंगून गेले.

जुलूसच्या शेवटी मौलानांनी सर्वांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.
समाजाच्या एकतेसाठी, भारत देशाच्या सुख-शांतीसाठी आणि जगात भारताला उंच स्थान मिळावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

या जुलूस मध्ये जाम मोहल्ला , ग्रीन पार्क, पटेल कॉलनी, खडका रोड, मुस्लिम कॉलनी, आगाखान वाडा, आगवाली चाळ, कंडारी परिसर, जुना सातारा आदी भागासह भुसावळ शहरात राहणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
या मिरवणुकीच्या दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या