Friday, May 1, 2026
Homeजळगावनायगाव येथील जि.प.प्रा.मराठी शाळेत सुरक्षा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करा. महाराष्ट्र नवनिर्माण...

नायगाव येथील जि.प.प्रा.मराठी शाळेत सुरक्षा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करा. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी.

नायगाव येथील जि.प.प्रा.मराठी शाळेत सुरक्षा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करा. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी.

यावल दि.९          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसह मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली.
नायगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र पवार,रवींद्र आसटकर,योगेश कोळी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आले आहे की,शाळेत काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
शिक्षण साहित्य,साधने व काही अन्य वस्तूंची चोरी होत आहे.या
प्रकारांना आळा बसावा व शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
त्वरित बसवणे आवश्यक झाले आहे. मोटकऱ्यात असलेल्या शाळेतील स्वच्छतागृहांची कमतरता आपल्या गावातील शाळेची पट संख्या तालुक्यात इतर शाळांच्या तुलनेत जास्त आहे.त्यामुळे इयत्ता ६ वी व ७ वी चे वर्ग मोटकऱ्यातील शाळेत भरवले जातात.मात्र,तेथे विद्यार्थी विशेषत: मुलीं करिता स्वतंत्र अशी स्वच्छतागृहाची सुविधा नाही यामुळे त्यांना असुविधेला सामोरे जावे लागत आहे.ही बाब अत्यंत गंभीर, चिंतनीय आहे,स्वच्छतागृह तातडीने बांधण्यात यावे.वरील दोन्ही विषय शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी व मूलभूत सोयी-सुविधांशी निगडित आहे याकडे आपण तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करून आपण जी कार्यवाही केली ती माहिती जनतेच्या व आमच्या माहितीसाठी लेखी स्वरूपात आम्हाला कळवावी.असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून त्यावर मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार राजेंद्र पवार रवींद्र आसटकर योगेश कोळी यांनी आपली स्वाक्षरी निवेदनाची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल यांच्याकडे माहितीस्तव दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या