सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन : विल्हाळे उपकेंद्रावर सात गावांचे शेतकरी एकत्र
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता .भुसावळ, दि ८ :
वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने आणि रात्रीच्या वेळी विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल सुरू असल्यामुळे,विल्हाळे उपकेंद्रावर आजपासून ठिय्या आंदोलन सोमवारी करण्यात आले होते.
या आंदोलनात विल्हाळे, मानमोडी ,खंडाळा,मोंढाळा,शिंदी,सुरवाडा आणि विचवा या सात गावांतील शेकडो शेतकरी सहभाग घेतला होता .
संबंधित शेतकरी मागणीवर ठाम
शेतकऱ्यांनी महावितरणकडे मागणी केली आहे की,सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत सिंगल फेज वीज पुरवठा सुरु करण्यात यावा, जेणेकरून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांचे रक्षण करता येईल.या मागणीसाठी शेतकरी प्रतिनिधी योगेश उर्फ नागो आत्माराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे
.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,आम्ही २०१९ पासून सातत्याने मागणी करतोय,मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दरवर्षी वन्य प्राण्यांमुळे पिकांचे प्रचंड नुकसान होते.रात्री लाईट नसल्याने काहीही उपाय करता येत नाही.

या ठिय्या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर,जिल्हा परिषद सदस्य डॉ उध्दव पाटील,आबा पाटील , किरण जाधव,विलास मुळे, सुभाष चौधरी , हेमंत पाटील, अशोक शिंदे,अरुण शिंदे,प्रमोद शिंदे , इंद्रसिंग पाटील,पुंडलीक पाटील,पंकज पाटील, दिलीप पाटील,योगेश पाटील,दिनकर पाटील, गोपाळ पाटील,मधुकर पाटील,किशोर पाटील ,सुपडू पाटील,मोहन पाटील,आत्माराम पाटील , विजय पाटील,सुभाष ठोके,दिनकर पाटील, हितेश पाटील,धनराज पाटील,बंटी पाटील, गजानन पाटील,मयूर पाटील,निलेश गांवडे, सतीष पाटील,निवृत्ती ढोले यांचे सह सात गावांचे शेतकरी सहभागी झाले .
आंदोलना ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट –
भुसावळ एकज्युकेट इंजिनीयर जे के भांबरे,
उपकार्यकारी अभियंता डि डि महाजन , सहाय्यक अभियता राहुल पाटील ,अकलेश कुमार कुशवा व पोलीस अधिकारी अमित बागुल आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी महावितरण कडून आठवड्यातून तीन दिवस फेज व चार दिवस सिंगल फेज असा प्रस्ताव देण्यात आला आधी आंदोलकांनी तो स्वीकारण्यात नकार दिला पण नंतर प्रस्ताव स्वीकार करून पुढील पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने अधिकारी यांचे म्हणणे ग्राहय मानण्यात आले आहे .

