युनिक इंटरनॅशनल शाळेत शिक्षक दिवस मुलांनी केला उत्साहात साजरा
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शिक्षक दिनानिमित्त बाल गुरूंनी आपल्याच सवंगड्यांना शिकवण्याचा मार्गदर्शन करण्याचा मनसोक्त आनंद घेतला त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्यातीलच एका मित्राला गुरूच्या रुपात बघून वेगळाच अनुभव घेत अधिक आनंद मिळवला अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री मासुळे यांनी मुलांचे कौतुक करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच शाळेतील शिक्षिका कांचन पाटील साक्षी पाटील अर्चना बैरागी शुभांगी निळे यांचा पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनानिमित्त अभिनंदन करण्यात आले. प्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. प्रतीक्षा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
संस्थापक अध्यक्ष श्री मासुळे सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत योग्य मार्गदर्शन केले.