महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ ; खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि ११ सप्टेंबर 2025):
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व भुसावळ येथील गोल्डन अवर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोजोरे येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास शंभराहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी सकाळपासूनच रुग्णांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली.
उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन –
या शिबिरास महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद पाटील (जळगाव), नाशिक येथील डॉ. प्रमोद महाजन, समाजसेवक महेंद्र पाटील सर (जळगाव), उद्योजक सुहास वारके (पुणे), विभाग संघटक विनीत हंबर्डीकर, तालुकाप्रमुख मंगेश पाटील, गाव प्रमुख हर्षल तळेले, नितीन राणे, अनंत भंगाळे, रामू पाटील, सुनील वारके, पांडुरंग जावळे आदींची उपस्थिती लाभली.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर आरोग्य तपासणी –
शिबिरात रक्तदाब, रक्त तपासणी व ईसीजी यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील सुधारणा याविषयी मार्गदर्शन दिले. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. आफताब खान, डॉ. तेहनीयत अंजुम मो. जफर, डॉ. ईरम शेख जावेद यांचा समावेश होता. गुनगुन कौशल व हसन खान या नर्सिंग स्टाफनेही तपासणीस मदत केली.
रुग्णालय प्रशासनाची सक्रिय भूमिका –
गोल्डन अवर रुग्णालयाचे अॅडमिन प्रमुख ईसरार अहमद व पीआरओ गणेश वाघ यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

