Friday, May 1, 2026
Homeजळगावधनाजी नाना महाविद्यालयातील उपक्रम --- रावेर-यावल परिसरातील लेखिका- लेखकांच्या ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन

धनाजी नाना महाविद्यालयातील उपक्रम — रावेर-यावल परिसरातील लेखिका- लेखकांच्या ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन

धनाजी नाना महाविद्यालयातील उपक्रम —
रावेर-यावल परिसरातील लेखिका- लेखकांच्या ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन

​फैजपूर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील धनाजी नाना महाविद्यालयात ग्रंथालय आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘रावेर-यावल परिसरातील लेखिका-लेखकांच्या ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सेमिनार हॉलसमोर हा कार्यक्रम पार पडला.
​या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. सिंधू भंगाळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी आपल्या लहानपणीच्या वाचनाच्या आठवणींना उजाळा दिला. मानवी जीवनात वाचनाचे तसेच लेखनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. झेड. सुरवाडे, प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे, प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. विजय तायडे, प्रा. डॉ. विजय सोनजे, आणि प्रा. उन्नती चौधरी हे मान्यवर उपस्थित होते.
​कार्यक्रमाच्या शेवटी उमाकांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहर्ष चौधरी, सुरेखा सोनवणे आणि यामिनी पाटील यांनी विशेष सहकार्य केले. या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व सर्वांना आपल्या परिसरातील लेखकांचा व त्यांच्या साहित्याचा परिचय झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या