यावल येथील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जमीन महसूल व आरसीसी थकबाकीदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद.

४ लाख ४ हजार रुपये वसूल.
यावल दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जमीन महसूल व आरसीसी थकबाकीदार यांच्याकडून एकूण ३५० प्रकरणात ४ लाख ४ हजार ६४ रुपये वसूल झाल्याने थकबाकीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
आज दि.१३ रोजी यावल येथील राष्ट्रीय लोक अदालत आयोजित कार्यक्रमात जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी मंडळ निहाय नियोजन करण्यात आले होते यात जमीन महसूल व RRC थकबाकीदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी मा.श्री. निवृत्ती गायकवाड,प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपूर यांचेसह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे आणि बी.एम.पवार, मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

