Wednesday, April 29, 2026
Homeआरोग्यपत्नीला चहा देण्यासाठी जात असताना खाली कोसळून तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पत्नीला चहा देण्यासाठी जात असताना खाली कोसळून तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पत्नीला चहा देण्यासाठी जात असताना खाली कोसळून तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील आडगाव येथे पत्नीला चहा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना, २९ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि मृत्युमुखी पडला. ही घटना शनिवारी आरोग्य केंद्राच्या आवारात घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मृताचे नाव पवन उर्फ पप्पू रमेश खंबायत (वय २९, रा. मालोद, ता.यावल) असे आहे. पत्नीची प्रसूती होऊन तिने शुक्रवारी एका मुलीला जन्म दिला होता. दुसऱ्या दिवशी पप्पू चहा घेऊन पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला. मात्र, तिथेच त्याला अचानक चक्कर येऊन तो कोसळला. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला तत्काळ यावल ग्रामीण हलवले. रुग्णालयात मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच, यावल पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार संदीप सूर्यवंशी व किशोर परदेशी करत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या