Friday, May 1, 2026
Homeजळगावनवरात्रोत्सवानिमित्त फैजपूर येथे शांतता कमिटीची बैठक

नवरात्रोत्सवानिमित्त फैजपूर येथे शांतता कमिटीची बैठक

नवरात्रोत्सवानिमित्त फैजपूर येथे शांतता कमिटीची बैठक

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

येणारा दुर्गोत्सव सर्वांनी भक्ती भावाने व शांततापूर्ण कोणत्याही अफवांना बळी न पडता साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी सांगितले. ते येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीत

 

अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी सांगितले की, फैजपूर शहर व परिसर शांतता प्रिय असल्याने या ठिकाणी सण व उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरे केले जातात. पुढील येणारा दुर्गोत्सवही मोठ्या भक्ती भावाने आनंदाने सर्वांनी साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील व नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच रावेर निंभोरा यावल येथील शांतता कमिटी सदस्य, पत्रकार यांचेसह पोलीस, होमगार्ड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या