Friday, May 1, 2026
Homeजळगावधनाजी नाना महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सेंटर फॉर...

धनाजी नाना महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस यांचेतर्फे कार्यशाळा

धनाजी नाना महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस यांचेतर्फे कार्यशाळा

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

तापी परिसर विद्या मंडळ संचलित, KIEDC समिति, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस (KCIIL), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात From Campus to Company: A Startup Pathway या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा, तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर व यावल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी, संचालक मंड्ळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे चेअरमन तथा रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डि. बि. तायडे यांच्यासहित प्रमुख अतिथी डॉ. नविन खंडारे (CEO, KCIIL), रोशनी जैन (Program Coordinator, KCIIL) स्थानिक KIEDC समितिचे प्रमुख उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, स्थानिक KIEDC चे समन्वयक प्रा. डॉ. योगेश तायडे , प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वप्ने पुर्ण करायची असतील तर उद्योजक व्हा – डॉ. नविन खंडारे

प्रत्येक व्यक्तीमधे उद्योजकतेची पायाभूत कल्पना असून सद्यस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशातून स्वतःमधील क्षमता आणि नाविन्यपूर्ण संकल्पना ओळखून त्यासाठी अचूक मार्गदर्शनाच्या बळावर उद्योगधंदा स्थापन केल्यास स्वतःसहित, परिवार, समाज व देशासाठी भरभराटीचे साधन होण्याचे महत् भाग्य विद्यार्थ्यांना लाभु शकते. विद्यापीठाच्या केसील उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सृजनशील, नाविन्यपूर्ण कल्पनेला व प्रयत्नांना मार्गदर्शनाची जोड देऊन नोकरी मागणारे न होता, नोकऱ्या देणारे व्हा. नोकरी फक्त तुमच्या गरजा पुर्ण शकते, जर तुम्हला तुमचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर उद्योजक व्हा, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख़ पाहुणे डॉ. नविन खंडारे सर यांनी विद्यर्थ्याना केले. यासोबत विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याना तसेच प्राध्याकांना कसा करून घेता येईल या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. योगेश तायडे यांनी केले. त्यात जगाला कलाटणी देणारे नाविन्यपूर्ण कल्पनेतून उदयास आलेल्या उबेर, ओला, स्विगी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या स्टार्टअप ची उदाहरणे देतानाच आपल्या जवळपास ज्यांनी उद्योगधंदे उभारले आहेत त्यांचा आदर्श समोर ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेवर काम करून स्वतःचा उद्योग उभारावा. याचसाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डि. बि. तायडे सर यांनी सांगितले की, आपला परिसर हा नैसर्गिकरीत्या परिपुर्ण असुन विविध फळे, पालेभाजि व केळीसाठी प्रसिद्ध आहेत. शेती मधिल जो टाकाऊ भाग आहेत त्या टाकाऊ पासुन आपण टिकाऊ प्रोडक्ट ची निर्मिती करु शाकतो व त्याचा आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांना सुद्धा फ़ायदा करुन देता येईल असे प्रतिपादन सरांनी केले. आपल्या परिसरातिल काही स्टार्टअपचे जे उदाहरण देउन विद्यार्थ्याना स्टार्टअपचे महत्व पटवून सांगितले. ज्या विद्यार्थ्याच्या काही नविन कल्पना असतील व ज्याना काही मार्गदर्शनाची जोड हवी असेल त्यांनी महाविद्यालयाच्या केसील विभागाला संपर्क साधावा व समाज आणि देश उभारणीसाठी उत्तरदायित्व स्वीकारावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. योगेश तायडे, व आभार प्रदर्शन डॉ. हरीश नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वसुंधरा फेगडे, प्रा. सुजित भाट इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या