Friday, May 1, 2026
Homeजळगावतनिक्षा टोके हिला लेवा समाज भुषण पुरस्कार प्रदान

तनिक्षा टोके हिला लेवा समाज भुषण पुरस्कार प्रदान

तनिक्षा टोके हिला लेवा समाज भुषण पुरस्कार प्रदान

बामणोद          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आर के इंगळे        ता.यावल येथील तनिक्षा प्रदीप टोके हिला‌ लेवा समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
लेवा युथ फोरम व लेवा शुभ मंगल यांच्या वतीने लेवा समाजातिल विवीध मान्यवरांना समाज भुषण पुरस्कार जे.टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पटांगणावर प्रदान करण्यात आले आहे .
तनिक्षाने अमेरीकेत पार पडलेल्या 24व्या अंतरराष्ट्रिय स्काऊट गाईड शिबिरात भारताचे प्रतिनिधित्व केले अमेरीकेतिल जम्बोरी येथील शिबिरात तब्बल 150 देशातील स्काऊट गाईड सहभागी झाले होते .
तनिक्षाला 2018 ला सुद्धा राज्य पुरस्कार मिळाला आहे
पुरस्कार शरद दादा महाजन यांचे हस्ते प्रदान करण्यात आला

 

Oplus_131072

या प्रसंगी बोलतांना माझ्या आयुष्यातील सर्व यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते मेहनतच माणसाला पुढे नेते व यशाचे शिखर गाठते हा माझा ठाम विश्वास आहे माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या पालकांचा आशिर्वाद व पाठिंबा असतो तनिक्षाने याप्रसंगी लेवा युथ फोरम व लेवा शुभ मंगल तसेच मार्गदर्शक श्री अतुल महाजन , श्री हर्षल भंगाळे , श्री हर्षल जावळे , किर्ति बोरोले मॅडम या सह सर्व मान्यवरांचे आभार मानले . यावेळी मान्यवरांनी तनिष्का ने केलेल्या कार्याचा गौरव केला असुन तनिष्का हिने समाजाचे च नव्हे तर देशाचे नाव उंचाविले असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाला रावेर विधानसभेचे आमदार अमोल भाऊ जावळे , भारतिय जनता पार्टी राज्य महिला उपाध्यक्ष केतकीताई पाटिल , तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद दादा महाजन व तर मान्यवर व समाज बंधु भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या