धनाजी नाना महाविद्यालयात दुहेरी यशाने उजळला प्राणीशास्त्र विभागाचा लौकीक
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

धनाजी नाना महाविद्यालया च्या प्राणिशास्त्र विभागामार्फत माजी विद्यार्थी निरज नंदाने यांची वाईल्ड लाईफ बायोलॉजीस्ट, जळगांव आणि गौरव शिंदे यांची सुद्धा वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहरादून येथे निवड झाल्याबद्दल तसेच कु. उज्वला ठोसरे यांनी महाराष्ट्र सेट परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. बी. वाघुळदे यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात प्राणीशास्त्र विभागाला प्राप्त झालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच प्राणीशास्त्र विषयाची व्याप्ती आणि नोकरीतील संधी याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. सविता अजित कलवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल महाजन यांनी तर आभार प्रा.स्वप्निल शाह यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किरण फेगडे, प्रा. ललिता पाटील, प्रा.उत्कर्षा कोल्हे, प्रा. कविता इंगळे यांनी सहकार्य केले तसेच शिक्षकेतर कर्मचारी दिलीप मेढे व गणेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

