Saturday, March 14, 2026
Homeजळगावके. नारखेडे विद्यालयात आंतरवर्गीय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व आरोग्य तपासणी कार्यक्रम...

के. नारखेडे विद्यालयात आंतरवर्गीय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न.

के. नारखेडे विद्यालयात आंतरवर्गीय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                       दिनांक 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार सकाळी दहा वाजता स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या 45 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आंतरवर्गीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑनररी जॉईंट सेक्रेटरी श्री. प्रमोद नेमाडे साहेब तर प्रमुख अतिथी आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.समीर खानापूरकर , बालरोग तज्ञ हे होते. मान्यवरांच्या हस्ते आय टी सॉफ्ट फ्युजन , इलेक्टस व्हीजन , बालवैज्ञानिक स्पर्धा, हस्तकला प्रदर्शन तसेच चित्रकला स्पर्धा या विभिन्न स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर समीर खानापूरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व स्पर्धक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले व विभिन्न स्पर्धा ह्या आयुष्यात आपला आत्मविश्वास वाढवण्यात आपल्याला कशा प्रकारे मदत करतात ते सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रमोद नेमाडे यांनी सुद्धा सर्व स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व दरवर्षी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा सोनवणे यांनी केले तसेच पारितोषिक विजेत्या स्पर्धकांच्या यादी वाचनाचे काम सौ. स्वाती इखे यांनी केले. इशस्तवन व स्वागत गीतासाठी संगीत साथ श्री. डी. एम. हेलोडे सर व विद्यार्थी सुदिक्षण चौधरी यांनी दिली. प्रमुख अतिथींचा परिचय इयत्ता 9 c ची विद्यार्थिनी जान्हवी भागवत पाटील हिने करून दिला. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाय एन झोपे ,उपमुख्याध्यापिका श्रीमती. संगीता अडकमोल टीचर, पर्यवेक्षक एस. एल. राणे सर, पर्यवेक्षक श्री. एस पी पाठक सर, संगणक विभाग प्रमुख श्री. बी. ए. पाटील सर तसेच संगणक विभाग व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,भुसावळ. संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री मकरंद नारखेडे तर उपाध्यक्ष डॉ.श्री किशोर नारखेडे ,चेअरमन श्री. श्रीनिवास एन. नारखेडे, सेक्रेटरी श्री. पी. व्ही. पाटील , संस्था सदस्य श्री. विकास पाचपांडे तसेच डॉ. श्री. संजीव एन. नारखेडे , श्री. भाग्येश नारखेडे यांनी कौतुक केले.
कार्यक्रमानंतर डॉक्टर श्री. समीर खानापूरकर यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना शारीरिक , मानसिक, भावनिक व बौद्धिक आरोग्य विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीश चिपळोणकर ,मनोज कुलकर्णी , शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, अनिल जटाळे, जी. व्ही. पाटील , संदीप पाटील, माधव गरुडे, विशाल राणे , नवीन नेमाडे , सौ. स्मिता झांबरे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या