Saturday, March 14, 2026
Homeगुन्हातरवाडे येथे जुगार खेळणे महागात पडले; १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

तरवाडे येथे जुगार खेळणे महागात पडले; १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

तरवाडे येथे जुगार खेळणे महागात पडले; १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             : तालुक्यातील तरवाडे येथे स्मशानभूमी जवळ सुरू असलेल्या झन्ना मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी ५ जणांना ताब्यात घेतले गेले, तर दोन जण पळून गेले.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या जुगारींकडून जुगाराची साधने, १४,८९० रुपये रोकड, ३८,००० रुपये किंमतीचे मोबाईल आणि १,१०,००० रुपये किंमतीच्या तीन दुचाकी असा एकूण १,६२,८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही माहिती सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले. एएसआय युवराज नाईक , हवालदार ओंकार सुतार , संदीप पाटील , पोकोन , विजय पाटील , श्रीराम कांगणे यांनी गुरुवारी (१२ मार्च) सकाळी १० वाजता छापा टाकला.या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या ५ जणांसह फरार दोन जुगारींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या