Saturday, February 21, 2026
Homeजळगावरावेरच्या पत्रकारांचा निषेध: त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात कडक कारवाईची मागणी

रावेरच्या पत्रकारांचा निषेध: त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात कडक कारवाईची मागणी

रावेरच्या पत्रकारांचा निषेध: त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात कडक कारवाईची मागणी

रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 रावेर, ता. २९ सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रावेरमधील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

२० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगच्या किरकोळ वादातून पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तसेच पत्रकार योगेश खरे आणि अभिजीत सोनवणे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

या पार्श्वभूमीवर, नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम व आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम तर्फे रावेरचे निवासी तहसीलदार संजय तायडे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत:
मुख्य मागण्या: – महाराष्ट्र प्रसारमाध्यम कायदा २०१७ अंतर्गत कठोर कारवाई:
हल्लेखोरांवर जामीन न मिळणारा गुन्हा नोंदवून, कलम ३ व ४ नुसार किमान १ ते ३ वर्षांची शिक्षा लागू करावी.IPC अंतर्गत गुन्हे नोंदवावेत: -कलम ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न), ३२६, ३२४, ३४१ अंतर्गत एफआयआर नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी.मोक्का अंतर्गत तपास:हल्लेखोरांचा पूर्वइतिहास तपासून, जर संघटित गुन्हेगारी सिद्ध झाली, तर मोक्का कायदा लागू करावा.प्रेस स्वातंत्र्याचे संरक्षण:अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाल्याने सरकारने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय करावेत.
राष्ट्रीय पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी:
केंद्र शासनाने विशेष संरक्षण सेल स्थापन करून NHRC व CPJच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास करावा.

जर पत्रकार सुरक्षित नसतील, तर सत्य बाहेर कसे येणार? – निषेध निवेदनातील प्रश्न पत्रकार संघटनांनी स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की, जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

निवेदनावर स्वाक्षरी करणारे प्रमुख प्रतिनिधी: –

प्रकाश सरदार – केंद्रीय महासचिव, नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम रमेश खंडारे – जिल्हा सचिव राहुल गाढे – राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष कसोदे – जिल्हा उपाध्यक्ष बाळू शिरतुरे – तालुका अध्यक्ष विजय अवसरमल, प्रशांत गाढे,राजेंद्र वाघ, प्रदीप कोचुरे,सैय्यद अन्वर अली, शेख याकुब शे.नजीर,उमेश तायडे तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा .
हा हल्ला फक्त व्यक्तिवर नव्हे, तर संपूर्ण पत्रकारितेवरच आहे. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ न्याय मिळाला नाही, तर पत्रकार संघटनांकडून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या