येथील जे.टी.महाजन विद्यालयात नवरात्र उत्सवानिमित् विद्यार्थिनींचा दांडिया कार्यक्रम.

यावल दि.३० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज मंगळवार दि. सप्टेंबर २०२५ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल मधे नवरात्र उत्सव निमित्त शाळेत विद्यार्थिनींचा दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम व इंग्रजी माध्यमच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांच्या हस्ते देवी सरस्वती व दुर्गा देवी प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून,नवदुर्गाची आरती म्हणून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इयत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थिनी चारू फेगडे,तेजस्वी पवार,रेश्मा पाटील, वेदिका बावस्कर,कल्याणी फालक, डिंपल पाटील,देविका तळेले, कावेरी चौधरी,विनिता पाटील,मित जैन,हेमंद्र महाजन याची देवीची नऊ रूपे साकारली व नऊ रूपांचा महिमा त्यांनी आपल्या नृत्यातून सादर केली तसेच इयत्ता 3 व 4 च्या हितेश्री न्हावी,वंशिका महाजन,
मिताली महाजन,खुशी सावखेडकर,प्रांजल कोळी,निधी रावते,कल्याणी बारी,मायरा पाटील,नेहल महाले,या चिमुकल्या विद्यार्थिनींनी नवदुर्गाच्या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले या कार्यक्रमामुळे सर्व शाळेचे वातावरण प्रसन्न व भक्तिमय झाले.
यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी दांडिया खेळून आपला आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम तसेच सौ. गौरी भिरूड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुलांचे सहकार्य लाभले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
अशा रीतीने शाळेत मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव निमित्त विद्यार्थिनींचा दांडिया कार्यक्रम साजरा करण्यात आला .

