खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामणोद शस्त्र पुजन ऊत्साहात :-
बामणोद खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी (आर.के.इंगळे) ता.यावल येथील प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शस्त्र पुजन ऊत्साहात संपन्न झाले
प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि. 1-10-2025 रोजी खंडे नवमीच्या मुहूर्तावर शस्त्र (अवजार , मशिनरी ) पुजन करण्यात आली सुरवातीला संस्था अध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे व चेअरमन डॉ. जे.डी.भंगाळे यांनी विश्वकर्मा व देवी सरस्वती यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन

नारळ अर्पण करण्यात आले संस्था सेक्रेटरी व संचालक मंडळ सदस्यांनी पुष्प अर्पण केले व प्रत्येक विभागातिल विद्यार्थ्यांच्या हस्ते त्या त्या विभागातिल मशिनरी पुजन करण्यात आले सदर प्रसंगी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन बऱ्हाटे सर यांनी विद्यार्थाना पुजन का करतात आध्यात्मिक व औद्योगीक या बद्दल सविस्तर माहिती दिली
याप्रसंगी संस्था संचालक प्रदिप टोके , देविदास तळेले, भागवत तळेले, मुरलीधर नेहते, सखाराम चौधरी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते

