Friday, May 1, 2026
Homeजळगावशिवसेना (शिंदे गट) मध्ये हिंगोणे (ता. यावल) येथील असंख्य नागरिकांचा उत्स्फूर्त पक्षप्रवेश!

शिवसेना (शिंदे गट) मध्ये हिंगोणे (ता. यावल) येथील असंख्य नागरिकांचा उत्स्फूर्त पक्षप्रवेश!

शिवसेना (शिंदे गट) मध्ये हिंगोणे (ता. यावल) येथील असंख्य नागरिकांचा उत्स्फूर्त पक्षप्रवेश!

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 हिंगोणे (ता. यावल), 01 ऑक्टोबर 2025:
हिंगोणे गावात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथराव शिंदे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील, तसेच रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख श्री समाधानभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने व नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य पुरुष व महिलांनी पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. उपस्थितांचे मन:पूर्वक स्वागत व मार्गदर्शन करण्यात आले.

 

Oplus_131072

या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री समाधान महाजन व सौ. नंदाताई निकम यांनी आपल्या भाषणात नवप्रवेशितांना शासनाच्या विविध योजना, विकास कार्यक्रमांची माहिती देत पक्षाच्या उद्दिष्टांविषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला:

श्री समाधान महाजन यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य श्री शांतारामभाऊ तायडे यांनी केला.

सौ. नंदाताई निकम यांचा सत्कार लक्ष्मिताई मेढे यांनी केला.

तालुकाप्रमुख श्री राजुभाऊ काठोके यांचा सत्कार सुरेश तायडे यांनी केला.

फैजपूर शहरप्रमुख पिंटुभाऊ मंडावले यांचा सत्कार शांताराम तायडे यांनी केला.

सावदा नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा नंदाताई लोखंडे यांचा सत्कार भाग्यश्रीताई मेढे यांनी केला.

भुसावळचे समाजसेवक प्रकाशभाऊ निकम यांचा सत्कार प्रशांत तायडे यांनी केला.

सुनीता तायडे यांचा सत्कार संगीताताई मिस्तरी यांचे हस्ते करण्यात आला.

 

Oplus_131072

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये हिंगोणे ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील अनेक मान्यवर नागरिक होते, यामध्ये: श्री शांताराम तायडे, लक्ष्मिताई मेढे, संगीताताई मिस्तरी, भाग्यश्री मेढे, तुषार पाणपाटील, सुरेश तायडे, प्रशांत तायडे, आकाश अडकमोल, मिलिंद तायडे, विजय सोनवणे, कमलाकर तायडे, राजू भालेराव, दगडू तायडे, पंकज तायडे, महमूद तडवी, कुरबान तडवी, शेख नबी, रामचंद्र बोदडे, विकास तायडे, सी. के. लोंढे, जीवन तायडे, सूर्यभान तायडे, नासीर तडवी, चेतन तायडे, सुपडू तडवी, विशाल भालेराव, अरुण कोळी, गौतम कचुरे यांचा समावेश होता.

हिंगोणे गावातील हा पक्षप्रवेशाचा उत्सव शिवसेनेच्या बळकटीकरणात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यामुळे आगामी काळात यावल तालुक्यात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या