सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न श्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

यावल दि.२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व श्री भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आज गुरुवार दि.२ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांनी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले व तद्नंतर भारतरत्न श्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांनी राष्ट्रीय स्वच्छता दिना बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली होती.

