Monday, July 6, 2026
Homeगुन्हाबसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत लंपास; गुन्हा दाखल!

बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत लंपास; गुन्हा दाखल!

बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत लंपास; गुन्हा दाखल!

धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धरणगाव शहरातील मुख्य बसस्थानकात प्रवासासाठी आलेल्या एका ७० वर्षीय वृध्द महिलेला चोरट्याने लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Oplus_131072

<img class

बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लंपास केली.बेबाबाई आनंद वाघमारे (वय ७०, रा. गौतम नगर, धरणगाव) या ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव बसस्थानकातून बसमध्ये चढत होत्या. वृद्ध महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून घेतली. या पोतीची अंदाजे किंमत ६४,००० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.चोरी झाल्याचे लक्षात येताच बेबाबाई यांनी परिसरात मोठी शोधाशोध केली, परंतु चोरट्याचा किंवा पोतीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर त्यांनी तातडीने दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.

 या घटनेमुळे बसस्थानकामध्ये होणाऱ्या चोऱ्यांच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नागरिकांनी विशेषतः वृध्द व्यक्तींनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या