भुसावळ येथील विवाहीतेचा पैश्यासाठी छ्ळ
पतीसह १७ जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
विवाहीतेचा मानसिक छळ, पैशांची व सोन्याची मागणी आणि तलाकच्या धमक्या दिल्याचा आरोप करीत ४१ वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या १७ जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शबाना मंजूर पटेल , खडका रोड, भुसावळ हिचा साबीर रशीद पटेल रा. मेहरूण, जळगाव याच्याशी १९ मे २००७ रोजी निकाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर महिनाभरातच सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाला. तलाकच्या धमक्या देणे तसेच पाच लाख रुपये आणि सोन्याची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
या छळाला कंटाळून तिने फेब्रुवारी २०२३ मध्ये तलाक घेतला होता . मात्र, पतीने माफी मागून पुन्हा त्रास देणारं नसल्याचे आश्वासन दिल्याने १० सप्टेंबर २०२३ रोजी दोघांनी पुन्हा निकाह केला.
त्यानंतरही छळ सुरूच राहिला. दरम्यान, १६ में २०२६ रोजी पतीने दुसरा विवाह केल्याचे समोर आले.
या प्रकरणी साबीर रशीद पटेल, शकीला रशीद पटेल यांच्यासह अंजुम अशफाक पटेल, अशफाक पटेल, फैसल अशफाक पटेल, सना जफर पटेल, जफर शफी पटेल, नाजीया इश्तियाक पटेल, इश्तियाक पटेल, शबनम आरीफ पटेल, आरीफ पटेल अशा १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टाफ करीत आहेत .

