Saturday, November 28, 2026
Homeगुन्हाभुसावळात सोन्याचे दागिने व रोकड लंपास

भुसावळात सोन्याचे दागिने व रोकड लंपास

भुसावळात सोन्याचे दागिने व रोकड लंपास
भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  शहरात फसवणुकीच्या माध्यमातून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र गोविंदा बारी (वय ६५) यांच्या बाबतीत ही घटना घडली. दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ ते १२.४५ वाजेच्या दरम्यान आरोपीने फसवणूक करून फिर्यादीकडील ऐवज लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे.या घटनेत सोन्याची चैन, सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या