Friday, May 1, 2026
Homeजळगावप्रभाव संपन्न कॉन्ट्रॅक्टरला वाचविण्यासाठी यावल महसूलकडून कारवाईचा देखावा.

प्रभाव संपन्न कॉन्ट्रॅक्टरला वाचविण्यासाठी यावल महसूलकडून कारवाईचा देखावा.

घटनास्थळी ८ ते १० डंपर, १ पोकलॅन्ड असताना कारवाई फक्त जेसीपी वर…

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तापी नदी पात्राला लागून असलेल्या एका शासकीय गट नंबर मध्ये भुसावळ शहरातील एका प्रख्यात कॉन्ट्रॅक्टरकडून बेकायदा वाजवीपेक्षा जास्त अवैध गौण खनिज उत्खनन करून मुरूम गौण खनिजाची अवैध,बेकायदा वाहतूक आठ ते दहा डंपरच्या माध्यमातून दररोज,दिवस रात्रभर सुरू असताना रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी यावल महसूलने कारवाईचा देखावा केल्याचे घटनास्थळावरील एका व्यक्तीने छायाचित्रासह प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
यावल महसूल कार्यक्षेत्रात तापी नदी पात्राच्या किनारी शासकीय जागेवर अवैध गौण खनिज उत्खननाचे काम पोकलेंड,आणि जेसीपी मशीनच्या साह्याने केले जात असून या अवैध खनिजाची वाहतूक भुसावळ येथील एक शासकीय कॉन्ट्रॅक्टर आपल्या मालकीच्या आठ ते दहा डंपर मधून दररोज रात्रंदिवस बेकायदा वाहतूक करीत आहे याची माहिती यावल महसूल विभागाला मिळाल्याने दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी घटनास्थळावरून एक जेसीपी मशीन आणि एक डंपर यावल तहसीलदार जप्त केले असली तरी प्रत्यक्ष त्यावेळेस आणि त्या ठिकाणी घटनास्थळी एक पोकलँड व आठ ते दहा डंपर ( हायवा नामक मोठे डंपर ) उभे असताना मंडळ
अधिकारी,तलाठी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत फक्त एक जेसीपी मशीन आणि १ डंपर यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहे. रविवार असल्याने याबाबत यावल तहसीलदार यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी या प्रकरणात मंडळ अधिकारी तलाठी यांच्या पथकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची शुद्ध कायदेशीर दिशाभूल केल्याची चर्चा संपूर्ण भुसावळ विभागात आहे.

कॉन्ट्रॅक्टर कडून पाटबंधारे विभाग आणि महसूलची दिशाभूल आणि फसवणूक ..? कारवाई काय होणार..?

तापी नदीच्या किनाऱ्यावर आणि यावल महसूल कार्यक्षेत्रातील अंजाळे शिवारातील शेत गट नंबर ५८७ / २ उतारा प्रत्यक्ष बघितला असता उताऱ्यावर कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ असे नाव लागलेले आहे.असे असताना या जागेवरून गौण खनिज उत्खननाचा परवाना देण्यात आला आहे किंवा कसे..? गौण खनिज उत्खननाच्या परवानगा देताना किती ब्रास गौण खनिज उत्खनन करण्यासाठी परवाना दिला..? आणि या उताऱ्यावरील क्षेत्रातून आतापर्यंत किती ब्रास गौण खनिज उत्खनन झाले,तसेच या क्षेत्रातील गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचा प्रत्यक्ष पंचनामा महसूल ने केल्यास संबंधित ठेकेदारांनी आतापर्यंत किती ब्रास उत्खनन केले आणि किती रॉयल्टी भरली याची वस्तुस्थिती समोर येईल.आणि पुढील दंडात्मक कारवाई करता येईल,आणि याकडे कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ ,आणि अंजाळे शिवारातील मंडळ अधिकारी, तलाठी यांचे दुर्लक्ष झाले का..? याची चौकशी करून पुढील कारवाई करावी अशी सुद्धा चर्चा संपूर्ण भुसावळ विभागात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या