Friday, May 1, 2026
Homeजळगावयेथील स्टेट बँकेचा ग्राहकांच्या हक्कावर आघात : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन.

येथील स्टेट बँकेचा ग्राहकांच्या हक्कावर आघात : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन.

येथील स्टेट बँकेचा ग्राहकांच्या हक्कावर आघात : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन.

यावल दि. ६         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         यावल येथील भारतीय स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांच्या हक्कावर आघात होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,योगेश पाटील यांनी व इतर सदस्यांनी केला आहे.

दि. ६ रोजी यावल येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,यावल तालुका हा आदिवासी बहुल तालुका असुन त्या मुळे ग्रामस्थांना / स्टेट बँक ग्राहकांना सेवा समस्यांना आपले शाखेत तोंड दयावे लागत आहे.
त्यात प्रामुख्याने लोकांना रोज पैसे जमा करणे व काढण्यासाठी
३-४ तास रांगेत उभे रहावे लागते कमचारी संख्या गेल्या वर्षापासुन
जशीच्या तशीच आहे. तसेच गंभीर बाब म्हणजे दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान बैंक पुर्णपणे व्यवहार,बँक सेवा बंद केली जाते बाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांना आता
जेवणाची वेळ आहे असे सांगुन हाकलले जाते ही बाब सुमारे वर्षभरापासुन बेकायदा सुरू आहे यामुळे शेकडो लोकांच्या, ग्राहकांच्या आमच्याकडे तक्रार आल्या असुन आदिवासी क्षेत्र
असल्याने वित्तीय समावेशनाची (Financial Inclusion) अवहेलना होत आहे बँकेची ही वागणुक ग्राहक हक्कांवर आघात करणारी आहे तसेच
पासबुक नोंदी प्रिंट साठी सुविधा उपलब्ध करावी दुपारच्या वेळी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी 1 किंवा 2 कर्मचारी ड्युटीवर ठेवणे.गर्दीच्या वेळी अतिरिक्त काउंटर उघडणे,शाखेत
तक्रार पेटी बोर्ड लावावा तरी आपण या गंभीर समस्येवर तातडीने कार्यवाही करून आमच्या तालुक्यातील ग्रामस्थ व आपले ग्राहक यांच्या समस्या ७ दिवसाचे आत सोडवाव्या आणि आपणाकडून लेखी उत्तराची
अपेक्षा ठेवतो. KYC संदर्भात बँकेकडून वेळोवेळी अडवणुक
करतात तरी आपण याबाबत ठोस कार्यवाही करावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष आकाश चोपडे, योगेश पाटील यांच्यासह इतर नागरिकांनी दिले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या