धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथे दिनांक ७/१०/२०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ होण्यासाठी आणि शरीर स्वास्थ्यासोबत चांगले शिक्षण मिळण्यासाठी “*विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना*” लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर वर्गात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी
विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे म्हणून दरवर्षी महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच या वर्षी सुद्धा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ३३९ विद्यार्थ्यांची (१२५ मुलं व २१४ मुलीं) आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी फैजपूर येथील सर्व नामांकित वैद्यकीय चिकित्सक डॉ.नितीन महाजन, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. उमेश चौधरी, डॉ.सुनील पाटील, डॉ. गणेश भारंबे, डॉ. गिरीश लोखंडे, डॉ. भरत महाजन, डॉ. गौरव चौधरी, डॉ.संध्या कुलकर्णी, डॉ. कीर्ती लोखंडे, डॉ.भाग्यश्री महाजन, डॉ. एकता सरोदे या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माहिती व प्रस्तावना आरोग्य समिती प्रमुख प्रा. नाहीदा कुरेशी यांनी केली तसेच उपस्थितांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य प्रो. मनोहर सुरवाडे, प्रो. कल्पना पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी समिती सदस्य डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा.भोजराज पाटील, प्रा. विवेक महाजन, प्रा. सुरेश वाघ विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

