Sunday, June 28, 2026
Homeजळगावपाल वृंदावन धाम आश्रमात २९ जून रोजी श्री हरी गोपाल गौशाळेचे उद्घाटन...

पाल वृंदावन धाम आश्रमात २९ जून रोजी श्री हरी गोपाल गौशाळेचे उद्घाटन समारोह

पाल वृंदावन धाम आश्रमात २९ जून रोजी श्री हरी गोपाल गौशाळेचे उद्घाटन समारोह

रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    पाल ता रावेर :- ब्रम्हलीन परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पदस्पर्शने पावन श्री वृंदावन धाम पाल आश्रमात दि २९ जून रोजी श्री हरी गोपाल गौशाळेचे उद्घाटन समारोह तसेच पूज्य बापूंजीचे कृपापात्र शिष्य विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात पूनम दर्शन महोत्सवात सत्संग अमृताचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या गो वर्धन गौवंश सेवा केंद्र योजने अंतर्गत आश्रमातील श्री हरी गोपाल गौ शाळेच्या शेड निर्माण कार्य पूर्ण होऊन त्याचे दि २९ जून रोजी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी उपस्थिती द्यावी असे आव्हाहन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार पाल वृंदावन धाम समिती तर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या