Sunday, June 28, 2026
Homeगुन्हावाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; चार संशयित ताब्यात, ३० दुचाकींसह मोठी कारवाई

वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; चार संशयित ताब्यात, ३० दुचाकींसह मोठी कारवाई

वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; चार संशयित ताब्यात, ३० दुचाकींसह मोठी कारवाई

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मुक्ताईनगर पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तब्बल ३० चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २७३/२०२६ (भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०२(२)) च्या तपासात तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान संशयितांनी संबंधित गुन्ह्यासह एकूण ३० मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरीनंतर या दुचाकी विविध रेल्वे स्थानके व बसस्थानकांवरील ‘पे अँड पार्क’मध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात उघड झाले.पोलिसांनी हस्तगत केलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील उधना (सुरत) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने केली.या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, विविध जिल्ह्यांतील अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या